ईपीएफओ पुढील आर्थिक वर्षातही ८.२५ टक्के व्याजदर कायम राहण्याची शक्यता

नोकरीपेशा वर्गासाठी मोठा दिलासा! २ मार्चला अंतिम निर्णय शक्य.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29 mins ago
ईपीएफओ पुढील आर्थिक वर्षातही ८.२५ टक्के व्याजदर कायम राहण्याची शक्यता

नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आर्थिक वर्ष २०२५-२६ (FY26) साठी पीएफ (PF) जमा रकमेवर ८.२५ टक्के इतका स्थिर व्याजदर कायम ठेवण्याची दाट शक्यता आहे. जर २ मार्च रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर सभासदांना सलग तिसऱ्या वर्षी ८.२५ टक्के परतावा मिळणार आहे. यामुळे निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी गुंतवणूकदारांना मोठा आधार मिळणार आहे.


EPFO retains 8.25% interest rate for 2024-25 - Rediff.com


समोर आलेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षात ईपीएफओकडे सरप्लस निधी उपलब्ध आहे. यामुळे व्याजदरात कपात न करता तो स्थिर ठेवणे शक्य होणार आहे. सुमारे ६ कोटींहून अधिक खातेदारांसाठी ही स्थिरता अत्यंत महत्त्वाची ठरेल. ईपीएफओचा एकूण व्यवस्थापन निधी २८ लाख कोटी रुपयांहून अधिक असून, हा निधी सुरक्षित आणि फायदेशीर अशा विविध माध्यमांमध्ये गुंतवला जातो. यामध्ये सरकारी रोखे, डेट इन्स्ट्रुमेंट आणि काही प्रमाणात इक्विटीचा (ETF) समावेश असतो. ही संतुलित गुंतवणूक रणनीती जोखीम कमी करून चांगला परतावा देण्यास मदत करते.


Is EPFO Going To Increase Interest Rate On PF Deposits? Here's What The  Govt Says - Outlook Money Retirement


येणाऱ्या काळात बाजारपेठेतील चढ-उतारांचा परिणाम व्याजावर होऊ नये, यासाठी ईपीएफओ आता 'इंटरेस्ट स्टेबलायझेशन रिझर्व्ह फंड' तयार करण्यावरही काम करत आहे. या निधीमुळे भविष्यात उत्पन्नात घट झाली तरी सभासदांना स्थिर परतावा देणे सोपे जाईल. उदाहरणादाखल पाहायचे झाले तर, जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात ५ लाख रुपये जमा असतील, तर ८.२५ टक्के दराने त्याला वर्षाला साधारण ४१,२५० रुपये व्याज मिळू शकते. ही रक्कम दीर्घकाळात निवृत्तीचा मोठा निधी उभारण्यासाठी अत्यंत मोलाची ठरते.


Your EPF money is set to rise at faster rate, 8.25% interest highest in 3  yrs | Personal Finance - Business Standard


आता सर्वांचे लक्ष २ मार्च रोजी होणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीकडे लागले आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत व्याजदराच्या प्रस्तावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. एकदा या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की, आर्थिक वर्ष २०२६ चे व्याज लवकरच सभासदांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.


हेही वाचा