सांगोल्डातील हॉटेलमधील स्व‌िमींग पूलमध्ये जखमी होऊन युवकाचा मृत्यू : मूळ केरळचा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
सांगोल्डातील हॉटेलमधील स्व‌िमींग पूलमध्ये जखमी होऊन युवकाचा मृत्यू :  मूळ केरळचा

पणजी : (Goa) सांगोल्डा (Sangolda)  येथील एका हॉटेलमधील (Hotel) स्व‌िमींग पूलमध्ये (Swimming Pool)  उडी घेतल्यानंतर केरळा (Kerala) येथील अजय पुलीक्कल (२३ वर्षे) हा  युवक गंभीर जखमी झाला. तेथून त्याला जवळच्या हॉस्प‌िटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. 

ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली, स्विमिंग पूलमध्ये आंघोळीसाठी उडी टाकल्यानंतर युवकाच्या नाकाला दुखापत झाली. पूलमधून बाहेर आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले असता; त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याची तब्बेत बिघडल्याने गोमेकॉत पाठवण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री मृत्यू पावला. केरळ येथून आलेला ३५ पर्यटकांचा एक गट शुक्रवारी सांगोल्डा येथील एका हॉटेलमध्ये उतरला होता. त्यात अजय पुलीक्कल यांचा समावेश होता. दरम्यान, यासंदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहेत.   

हेही वाचा