मार्ना, शिवोली येथे अपघातात नेपाळी युवकाचा मृत्यू

दोघे गंभीर जखमी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
57 mins ago
मार्ना, शिवोली येथे अपघातात नेपाळी युवकाचा मृत्यू

म्हापसा : गोव्यातील (Goa) सोनारखंड, मार्ना, शिवोली (Siolim) येथे झालेल्या स्वयंअपघात बिबेक चौधरी (२२ वर्षे, रा. मार्ना, शिवोली, मूळ नेपाळ (Nepal)) या युवकाचा मृत्यू झाला.  पवन चौधरी (२४ वर्षे) व सागर चौधरी (३२ वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोमेकॉत (GMC) उपचार सुरू आहेत.

 हा अपघात गुरूवारी दि. १२ रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडला. मयत व जखमी हे आसगावहून मार्ना शिवोलीच्या दिशेने स्कूटरवरून येत होते. घटनास्थळी सोनारखंड येथे उतरणीवर दुचाकी चालक सागर चौधरी यांचे गाडी वरील नियंत्रण सुटले व भरधाव दुचाकीने प्रथम रस्त्याकडेच्या घराच्या संरक्षक भिंतीला व नंतर तिथे पार्क केलेल्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले मयत बिबेक चौधरी व जखमी पवन चौधरी आणि चालक सागर चौधरी हे तिघेही जखमी झाले. जखमींना लगेच शिवोली आरोग्य केंद्रातून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे उपचारा वेळी बिबेक याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या पवन चौधरी व सागर चौधरी याला गोमेकॉत पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचा माहिती मिळताच हणजूण पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र राऊळ यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचानामा केला. त्या पूर्वीच तिघाही दुचाकीस्वारांना इस्पितळात हलवण्यात आले होते. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लिशा खर्बे या करत आहेत.


हेही वाचा