ब्रम्हकरमळी, सत्तरी येथे गव्यांचा धुमाकूळ; बागायतीची नासधूस

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
09th February, 05:53 pm
ब्रम्हकरमळी, सत्तरी येथे गव्यांचा धुमाकूळ; बागायतीची नासधूस

वाळपई : गोव्यातील (Goa) सत्तरी तालुक्यात (Sattari Taluka)  गव्यांचा धुमाकूळ सुरू असून; बागायतीत शिरून केळी, कवाथे, सुपारीची झाडे यांची हानी करीत आहेत. त्यामुळे बागायतदार, शेतकरी (Farmers) यांना मोठा फटका बसत आहे.

ब्रम्हकरमळी येथे गव्यांच्या एका कळपाने प्रगतीशील शेतकरी सखाराम देसाई,  अमितकुमार देसाई यांच्या बागायतीत शिरून मोठी हानी केली. केळी, सुपारीची झाडे मोडून टाकल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. रात्री उशिरा गव्यांचे कळप दगडांचे कुंपण तोडून बागायतीत शिरतात व नासधूस करतात.

केळी, सुपारीची रोपटे तुडवून नष्ट करतात. त्यामुळे कष्टाने फुलवलेली बागायत नष्ट होते व जबर फटका बसत असल्याचे बागायतदार सखाराम देसाई यांनी सांगितले. वन विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानीची योग्य भरपाई द्यावी व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. 

 

हेही वाचा