मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास

पणजी : गोव्यातील (Goa) पेडणे तालुक्यात (Pernem Taluka) खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना (Farmers) अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचा जास्त फटका मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. खत आणण्यासाठी महाराष्ट्रातील आरोंदा, बांदा, शिरोडा येथे जावे लागत असल्याची माहिती मोरजीतील काही शेतकऱ्यांनी दिली.
मांद्रे (Mandrem) मतदारसंघात खत उपलब्ध नाही. पेडणे तालुक्यातही खताचा तुटवडा आहे. मोरजी येथे खत साठवून ठेवण्यासाठी गोदामाची सोय नाही. त्यामुळे पावसाळ्यातही शेती करताना अडचणींचा सामना करावा लागतो. खत आणण्यासाठी महाराष्ट्रातील आरोंदा, बांदा, शिरोडा इत्यादी ठिकाणी जावे लागते.
मोरजी येथे खत साठवणुकीची सुविधा तयार करावी. तसेच कृषी खात्याचे एक छोटेसे कार्यालय सुरू करून खते, बियाणी उपलब्ध करून द्यावीत. त्याचबरोबर कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती देणारे केंद्र सुरू करावे, अशी मागणी मोरजीतील शेतकरी शिवनाथ शेटगावकर, रविकांत शेटगावकर, अजित शेटगावकर यांनी केली.