ताळगाव पंचायत १० नगरपालिकांपेक्षा श्रीमंत

घरपट्टीतून ३ कोटींचा महसूल : साधनसुविधांमुळे उत्पन्नात मोठी वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th February, 10:43 pm
ताळगाव पंचायत १० नगरपालिकांपेक्षा श्रीमंत

पणजी : ताळगाव ग्रामपंचायत राज्यातील १३ पैकी १० नगरपालिकांपेक्षा श्रीमंत ठरली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये या पंचायतीने केवळ घरपट्टीतून ३.०१ कोटी रुपये महसूल जमा केला असून, मडगाव, म्हापसा आणि मुरगाव वगळता अन्य सर्व नगरपालिकांना ताळगावने मागे टाकले आहे.

राजधानी पणजीला लागून असलेल्या ताळगावमध्ये वाढते बांधकाम प्रकल्प आणि साधनसुविधांमुळे महसुलाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. मागील पाच वर्षांत या पंचायतीच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे.

ताळगाव पंचायतीचा महसूल आलेख (घरपट्टी)

आर्थिक वर्ष जमा महसूल (कोटी रुपयांत)
२०२०-२१ १.५१ कोटी
२०२२-२३ २.१० कोटी
२०२४-२५ ३.०१ कोटी

नगरपालिकांशी तुलना (२०२४-२५ घरपट्टी महसूल)

काही प्रमुख नगरपालिकांच्या घरपट्टी वसुलीची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

नगरपालिका वसुली (लाख/कोटींत)
मडगाव पालिका १०.१६ कोटी
म्हापसा पालिका ७.४३ कोटी
फोंडा पालिका २.११ कोटी
डिचोली पालिका ९४.६५ लाख
साखळी पालिका ४७.१८ लाख
पेडणे पालिका १४.९५ लाख

ग्रामीण विरुद्ध शहरी महसूल

ग्रामीण भागातील पंचायतींचा महसूल तुलनेने अत्यल्प आहे. सांगे तालुक्यातील कुर्डी पंचायतीचा महसूल सर्वात कमी (१६,०६७ रुपये) राहिला आहे. दुसरीकडे, पणजी महापालिकेने मागील पाच वर्षांत १०८.३४ कोटी रुपये घरपट्टीतून मिळवून मोठी भरारी घेतली आहे.

#TaleigaoPanchayat #GoaRevenue #HouseTax #GoaNews #MunicipalCouncil #PanajiCorporation #GoaPolitics