श्रीपाद नाईक : आंदोलकांची घरासमोर निदर्शने

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : युनिटी मॉल रद्द करण्याच्या मागणीसाठी चिंबल ग्रामस्थांनी रविवारी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या जुने गोवे (सापेंद्र) येथील घरासमोर निदर्शने केली. युनिटी मॉल केंंद्र सरकारचा प्रकल्प असल्यामुळे तो रद्द करण्याविषयी खासदार या नात्याने केंद्र सरकार व केंंद्रीय मंत्र्यांशी बोलावे, अशी मागणी श्रीपाद नाईक यांच्याकडे करण्यात आली. चिंंबल ग्रामस्थांना प्रकल्प नको असेल तर तो प्रकल्प सरकारने रद्द करावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे, असे श्रीपाद नाईक यांनी आंंदोलकांंना सांगितले.
युनिटी मॉलच्या विरोधात २८ डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे. युनिटी मॉल प्रकल्प चिंंबल तळ्याच्या प्रभाव क्षेत्रापासून दूर आहे, असा सरकारचा दावा आहे. तर हा दावा चुकीचा असल्याचे आंदोलकांचे मत आहे. आता एनआयओ, पाणीपुरवठा खाते चिंंबल तळ्याचे प्रभाव क्षेत्र आणि युनिटी मॉल प्रकल्पामुळे होणाऱ्या परिणामाविषयी नव्याने अभ्यास करत आहे. शनिवारपासून सुरू झालेला सर्व्हे रविवारीही सुरू होता.