सशक्त, अखंड भारत निर्माण करण्यासाठी वचनबद्ध होऊया!

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचा गोमंतकीयांना संदेश


25th January, 11:54 pm
सशक्त, अखंड भारत निर्माण करण्यासाठी वचनबद्ध होऊया!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक आणि लोकशाही संविधानाच्या शिल्पकारास मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली आहे. आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, दरवर्षी हा दिवस देशभरात देशभक्तीच्या भावनेने साजरा केला जातो. लोकशाही देशाचे नागरिक म्हणून आम्ही आमच्या आदर्श संविधानाने दिलेले हक्क स्वीकारताना आपण भारताला भरभराटीचे राष्ट्र बनविण्यासाठी लोकशाही मूल्ये उचलून धरली पाहिजे. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्राच्या प्रवासातील ऐतिहासिक टप्पा आहे. आपण मूलभूत हक्कांचा आनंद घेत असल्याने प्रत्येक नागरिकाने राष्ट्राच्या लोकशाही तत्त्वांना सर्वोच्च स्थान देण्यासाठी मूलभूत कर्तव्ये पाळली पाहिजेत. घटनेच्या शिल्पकाराची आपण आठवण केली पाहिजे.
राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला सुधारित पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’चे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वानी एकत्रित योगदान दिले पाहिजे. या पवित्र दिवशी सशक्त, अखंड भारत निर्माण करण्यासाठी आपण पुन्हा वचनबद्ध होऊया, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.

हेही वाचा