दोन दिवसांची पोलीस कोठडी

म्हापसा : पर्वरी (Porvorim) येथील पीडीए कॉलनीमध्ये (PDA Colony) कोल्ड्रींक घेण्याचा बहाण्याने महिलेची सोनसाखळी (Gold Chain) हिसकावून पळविल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव इक्रम अख्तर (३६ वर्षे, (३६, मंगलौर, हरिद्वार, उत्तराखंड) असे आहे. यापूर्वी याप्रकरणी अब्दुल रेहमान (३२) याला अटक केली होती.
अटक करण्यात आलेल्या इक्रम याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती साळगाव पोलिसांनी दिली. सोनसाखळी लांबवण्याची ही घटना २५ डिसेंबर रोजी घडली होती. मेधा आगशीकर आपल्या दुकानात बसली होती. त्यावेळी स्कूटरने दोन इसम आले व शितपेय मागितले. शितपेय देण्यासाठी महिला उठली असता मंगळसूत्र हिसकावून पळाले होते. त्यावेळी महिला जमिनीवर कोसळून जखमी झाली होती. हा चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये बंदीस्त झाला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक अक्षय फातर्पेकर अधिक तपास करीत आहेत.