
पणजी : शिरगाव (Shirgao) येथील लईराई जात्रेत झालेली चेंगराचेंगरी व बर्च बाय रोमीओ लेन क्लबला (Birch by Romeo Lane Club) लागलेल्या आगीतील मृतांना आज गोवा विधानसभेत (Goa Assembly) श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सभापती गणेश गावकर यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. सभागृहातील सर्वांनी एक मिनीट शांतता पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षांचे आमदार सभागृहात हजर नव्हते.
तत्पूर्वी महामहीम राज्यपाल पुसापुती अशोक गजपती राजू यांनी सुद्धा अभिभाषणात मृतांना श्रद्धांजली वाहिली. शिरगावची चेंगराचेंगरी, बर्च दुर्घटना व रस्त्यावर होणाऱ्या अपघातात मरण पावणाऱ्यांना मी श्रद्धांजली वाहतो, असो उल्लेख राज्यपालांनी भाषणात केला.
शिरगाव येथील लईराई जात्रेत गेल्या वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भाविकाना मरण आले होते. तसेच बर्च बाय रोमिओ लेन क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला होता.