विकसित गोवा २०३७ चा आराखडा अखेरच्या टप्प्यात;राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरू

पणजी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत (India) करण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे. विकसित भारत २०४७ च्या धर्तीवर २०३७ पर्यंत विकसित गोवा
(Goa) करण्यासाठीचा आराखडा अंतिम टप्प्यात पोचला आहे. २०३७ पर्यंत विकसित गोव्यासाठीची सर्व उद्दिष्टे पूर्ण होणार, असा विश्वास राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी अभिभाषणात व्यक्त केला.
पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवात आज सोमवारी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या अभिभाषणाने झाली. प्राथमिक सुविधा, आरोग्य, शिक्षण, वीज, सार्वजनिक बांधकाम, शेती, जल पुरवठा, कला, समाज कल्याण, मच्छीमारी या सर्व क्षेत्रातील कामगिरीचा आढावा राज्यपालांनी अभिभाषणात मांडला.
अभिभाषणात राज्यपालांनी मांडलेले विशेष मुद्दे असे :
कुशावती ह्या तिसऱ्या जिल्ह्यामुळे प्राथमिक पायाभूत सुविधा तयार होऊन प्रशासन लोकांच्या दारी पोहोचणार.
पहिल्याच वेळी गोव्याचा नकाशा कोकणीतून तयार झाला आहे. गोव्याचा वारसा, संस्कृती आणि कोकणीला प्रोत्साहत मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल.
घर नावावर करणारी माझे घर योजनेमुळे हॅप्पीनेस इंडेक्स (समाधान) वाढणार.
२८ फेब्रुवारी, २०१४ पर्यंतची घरे नियमित करण्यासाठी भू महसूल संहितेच्या कलम ३८ ए मध्ये दुरूस्ती.
कोमुनिदाद जमिनीतील घरे नियमित करण्यासाठी कोमुनिदाद कायद्यात दुरूस्ती
रूका कायद्याखाली पंचायत क्षेत्रात ६०० चौ.मी. आणि पालिका क्षेत्रात १ हजार चौ.मी. पर्यंतची बांधकामे नियमित.
जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे अभिनंदन
पद्मश्रीसाठी लिबिया लोबो सरदेसाई आणि गोमंत विभूषण पुरस्कारासाठी अजितकुमार कडकडे यांचे अभिनंदन
इफ्फीसाठी प्राथमिक सुविधांसाठी गोव्याची सर्जनशील राजधानी अशी ओळख.
आकडेवारीप्रमाणे २०२४-२४ वर्षी गोव्याचा विकास दर १४.९४ टक्के
कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात. गुन्हेगारीच्या तपासाचे प्रमाण ८७.७२ टक्के
सायबर गुन्ह्यांच्या तपासाठी एआय आधारीत तपास प्रणाली. सायबर क्राईम केंद्र होणार बळकट.
सांगे, तळपण आणि मायणा कुडतरी पोलीस स्थानकांसठी नव्या इमारती
सरकारी सेवा कार्यक्षम करण्यासाठी कर्मचारी भरती आयोगामार्फत गुणवान कर्मचाऱ्यांची भरती
तक्रारी, समस्या मांडण्यासाठी नवा अॅड्रोयड आणि आयओएस आधारीत अॅप
अग्नीशमन दलाने ऑक्टोबर पर्यंत १४० माणसे व ६९० जनारांचा जीव वाचवला. २९.५४ कोटींची मालमत्ता वाचवली.
डिचोली, वास्कोत नवी अग्नीशामक दलाची स्थानके. वाळपई अग्नीशामक स्थानकाचे लवकरच उद्घाटन
रस्ता अपघात नुकसान भरपाई योजनेखाली ५९ जणांना १.१८ कोटींची भरपाई
ग्राम समृद्धी योजनेखाली नोव्हेंबर पर्यंत १०.६५ कोटींची २६ कामे पूर्ण. १६ कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर
गोव्याच्या साक्षरतेचे प्रमाण ९९.७२ टक्के. राष्ट्रीय प्रमाण ९५ टक्के
सरकारी महाविद्यालय साखळी, खांडोळा आणि केपे येथे हॉस्टेल सुविधा
३०४८ शेतकऱ्यांना २३९.४८ लाखांची आधारभूत रक्कम
१२६३ शेतकऱ्यांकडून १३८५.५१ मेट्रिक टन भाजीची खरेदी
मुख्यमंत्री सुधारीत कामधेनू योजनेखाली २७ शेतकऱ्यांना ६६.५८ लाखाचे अनुदान
२०२३- २४ च्या तुलनेत यावर्षी मासळीचे उत्पादन १.१७ टक्क्यांनी वाढले
१२ खाण ब्लॉकांचा लिलाव. ५ खाण ब्लॉक सुरू. २५२.५८ कोटींचा महसूल
दोनापावल परिषद गृहासाठी निविदा जारी