गवे रेडे, रान डुक्कर यांचा संचार वाढला

पणजी : गोव्यातील (Goa) कुडचिरे ते डिचोली (Bicholim) रस्त्यावर वाठादेत येथे रस्ता ओलांडणाऱ्या गव्या रेड्याची बोलेरो गाडीला (Bolero Vehicle) धडक बसली. त्यात गाडीचे बरेच नुकसान झाले. गाडीत चालकासह दोघेजण होते.
दरम्यान, डिचोली तसेच आसपासच्या परिसरात गवे रेडे (Indian Bison), रान डुक्कर (Wild Boar) व इतर प्राण्यांचा संचार वाढला असून, हे वन्य प्राणी वाहन चालक, शेतकरी यांना डोकेदुखी ठरले आहेत. वन्य प्राण्यांमुळे अपघात होत आहेत. त्याचबरोबर गवे रेडे, रान डुक्कर, वानर शेती, बागायतीचीही हानी करीत आहेत. वन खाते व कृषी खात्याने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही तरी उपाय करावा, अशी स्थानिकांची मागणी होत आहे.