फोंडा : कुर्टी मतदारसंघात भाजप उमेदवार प्रितेश गावसकर यांना वाढता पाठिंबा

रितेश रवी नाईक यांच्या पुढाकारामुळे प्रचाराला वेग

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
10th December, 12:12 am
फोंडा : कुर्टी मतदारसंघात भाजप उमेदवार प्रितेश गावसकर यांना वाढता पाठिंबा

फोंडा हाऊसिंग बोर्ड परिसरात प्रचार करताना रितेश नाईक यांच्यासह भाजपचे उमेदवार प्रितेश गावसकर व कार्यकर्ते.

फोंडा :
कुर्टी जिल्हा पंचायत मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रितेश गावसकर यांना प्रचारात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. रितेश रवी नाईक यांच्या पुढाकारामुळे प्रचार अधिक वेगाने पुढे जात आहे.
रितेश नाईक यांनी सलग सहा दिवसांपासून दररोज प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. ते स्वतः अग्रभागी राहून कार्यकर्त्यांत प्रेरणा निर्माण करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण उपस्थितीमुळे या प्रचाराचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सहाव्या दिवशी फोंडा हाऊसिंग बोर्ड परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजप उमेदवाराला भक्कम पाठिंबा दिला.
माध्यमांशी बोलताना रितेश नाईक यांनी, आगामी निवडणुकीबाबत प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला. आम्हाला मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे आम्ही कुर्टीमध्ये प्रचंड विजय मिळवू, असा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
आगामी काळात प्रचार आणखी वेगाने राबविण्यात येणार असून कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून विकास आणि प्रगतीचा आलेख मांडणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.

हेही वाचा