१८ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत धावणार विशेष गाड्या

मडगाव : नाताळ (Christmas) व नववर्षानिमित्त (New Year) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर सीएसएमटी मुंबई (mumbai) ते करमळी, एलटीटी ते तिरुवनंतपुरम, एलटीटी ते मंगळुरू जंक्शन व यशवंतपूर एक्सप्रेस या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी - करमळी विशेष (दैनिक) गाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत दररोज मुंबई सीएसएमटीहून ००.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमळीला पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०११५२ करमळी ते सीएसएमटी विशेष गाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत दररोज दुपारी १.१५ वाजता करमळीहून सुटेल. ही ट्रेन दुसर्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. एकूण २२ डब्यांची ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवी स्थानकांवर थांबेल.
रेल्वे क्रमांक ०११७१ लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम उत्तर विशेष (साप्ताहिक) ही गाडी गुरुवार १८, २५ डिसेंबर, १ व ८ जानेवारी रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४ वाजता सुटेल व दुसर्या दिवशी रात्री ११.३० वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०११७२ तिरुवनंतपुरम उत्तर - लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) तिरुवनंतपुरम उत्तर येथून शनिवार, २०, २७ डिसेंबर, ३ व १० जानेवारी रोजी दुपारी ४.२० वाजता सुटेल. ही ट्रेन तिसर्या दिवशी १ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
एकूण २२ डब्यांची ही रेल्वे ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंडुराबी रोड, मुकदुर्ग रोड, सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, अलुवा, एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, चांगनासेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम, करुणागपल्ली, सस्थानकोट्टा, कोल आणि वर्कला शिवगिरी या स्थानकांवर थांबेल.
रेल्वे क्रमांक ०११८५ लोकमान्य टिळक (टी) - मंगळुरू जंक्शन विशेष (साप्ताहिक) मंगळवार, १६, २३, ३० डिसेंबर आणि ६ जानेवारी रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४ वाजता सुटेल व दुसर्या दिवशी सकाळी १०.०५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११८६ मंगळुरु जं. - लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) मंगळुरू जंक्शन येथून १७, २४, ३१ डिसेंबर आणि ७ जानेवारी रोजी १३ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक (टी) येथे दुसर्या दिवशी ६.५० वाजता पोहोचेल.
एकूण २२ डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदुराबी रोड, सुरतकल या स्थानकांवर थांबेल.
रेल्वे क्रमांक ०६२६७ यशवंतपूर - कारवार एक्सप्रेस स्पेशल गाडी २४ व २७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता यशवंतपूरहून सुटेल व दुसर्या दिवशी सकाळी ६.१० वाजता कारवारला पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०६२६८ कारवार - यशवंतपूर एक्सप्रेस विशेष ही गाडी २५ व २८ डिसेंबर रोजी कारवार येथून दुपारी १२ वाजता सुटेल व दुसर्या दिवशी ४.३० वाजता यशवंतपूरला पोहोचेल. एकूण २१ डब्यांची ही गाडी चिकबनावर, कुनिगल, चन्नरायपटना, हसन, सकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, काबाकापुत्तूर, बंटवाला, सुरथकल, मुलकी, उडुपी, बारकुर, कुंडापुरा, मुकाम्बिका रोड, भटकळ, मुर्डेश्वर, होन्नावर, कुमठा, गोकर्ण रोड आणि अंकोला स्टेशनवर थांबेल.