राज्यातील सायबर गुन्ह्यांत पाच वर्षांत ४०० टक्क्यांहून अधिक वाढ

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
राज्यातील सायबर गुन्ह्यांत पाच वर्षांत ४०० टक्क्यांहून अधिक वाढ

पणजी : राज्यातपाच वर्षांत सायबर गुन्ह्यांत(Cyber Crime) वाढ झाली आहे.केंद्र सरकारच्या(Central Government) राष्ट्रीय(National) सायबर गुन्हेगारीरिपोर्टिंग पोर्टलवर (Portal) २०१९ मध्ये सायबरगुन्ह्यांबाबत १५ तक्रारीदाखल झाल्या होत्या. २०२३अखेरीस त्यात वाढ होऊन त्या८६ झाल्या. पाचवर्षांत सायबर गुन्ह्यांच्यातक्रारीत ४७३.३३टक्क्यांनी वाढ झाली आहे.लोकसभेतील प्रश्नाच्याउत्तरातून ही माहिती मिळालीआहे.
उत्तरातदिलेल्या माहितीनुसार,गोव्यातून सायबरगुन्हेगारी रिपोर्टिंगपोर्टलवर २०२० मध्ये ४०,२०२१ मध्ये ३६, तर२०२२ मध्ये ९० तक्रारी दाखलझाल्या होत्या. यातीलबहुतेक तक्रारी सायबर फसवणुकीच्याहोत्या. राष्ट्रीयपोर्टल सुरू होण्यापूर्वी२०१५ मध्ये गोव्यात सायबरगुन्ह्यांबाबत १७ तक्रारीदाखल झाल्या होत्या. २०१६मध्ये ३१, २०१७ मध्ये१३, तर २०१८ मध्ये२९ तक्रारी दाखल झाल्या होत्या.
संपूर्ण देशाचाविचार करता, २०१९ते २०२३ दरम्यान ३ लाखांहूनअधिक तक्रारी पोर्टलवर नोंदझाल्या होत्या. यातीलसर्वाधिक ६० हजार तक्रारीकेवळ कर्नाटकमधून आल्याहोत्या. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र,तेलंगणा येथून आलेल्यातक्रारींची संख्यादेखील अधिकहोती. वरील कालावधीतनागालँडमधून सर्वात कमीम्हणजेच केवळ २४ तक्रारी दाखलझाल्या होत्या. मणिपूर,मिझोराम, त्रिपुरायेथून तक्रारीचे प्रमाण कमी होते.

हेही वाचा