पडोसे-सत्तरी येथील गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून छडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
पडोसे-सत्तरी येथील गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून छडा

वाळपई : पडोसे-सत्तरी येथील गोळीबार प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावलाआहे. दारूड्यांचा उपद्रव टाळण्यासाठी लपून केला गोळीबार केल्याची कबुली संशयिताने दिली आहे.

झरीवाडा–पडोसे परिसरात गेल्या काही दिवसांत सलग गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडूनही पोलिसांना छडा लावता आला नव्हता. चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा गनशॉट झाल्यानंतर नागरिकांचा संताप उसळला आणि त्यांनी कटाक्षाने तपासाची मागणी केली. नागरिकांतील वाढत्या आक्रमकतेनंतर वाळपई पोलिसांनी अखेर कोंबिंग ऑपरेशन राबवून एका घरातून गनशॉटसाठी लागणारे साहित्य जप्त केले. या संबंधी नंदकुमार आपटे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

आपटे याने पोलिसांना चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, झरीवाडा परिसरात दररोज रात्री दारूच्या पार्ट्या, आरडाओरडा, महिलांची छेडछाड आणि गोंधळ सुरु असतो. अनेक वेळा तक्रारी करूनही याबाबत कोणतीही पोलीस कारवाई होत नसल्याने त्रस्त होऊन आपण

स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर दडपण आणल्यानंतर उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घराघरांत जाऊन तपासणी सुरु केली.या कारवाईदरम्यान नंदकुमार आपटे यांच्या घरात शोध घेतला असता गनशॉटसाठी लागणारे साहित्य, लपवून ठेवलेली सामग्रीआढळून आली. आपटे सुरुवातीला तपासादरम्यान गडबडले, त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि चौकशीदरम्यान त्यांनी गनशॉट केल्याची कबुली दिली. चार दिवसांपूर्वी रात्री ८ वाजता या भागात बंदुकीचा आवाज ऐकू आला होता. नागरिकांमध्ये गोळीबाराची चर्चा पसरली होती. याआधी महिनाभरापूर्वी अशीच घटना घडली होती. मात्र पोलिसांना याचा छडा लागला नव्हता. पुन्हा घटना घडल्यानंतर लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दबाव आणला. त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले. पोलिसांनी आपटे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याला अटक केलेली नाही. त्यांना आवश्यकतेनुसार पोलीस स्थानकात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या दारुड्यांना पळवण्यासाठीच गोळीबार केल्याची कबुली आपटे याने दिली आहे. त्यामागे कोणताही गुन्हेगारीचा उद्देश नव्हता, असे त्याने सांगितले. 

हेही वाचा