सावधान! थंडीत शेकोटी पेटवून झोपताय : बेळगावात तिघांचा गुदमरून मृत्यू; एक गंभीर

कोळशाची शेगडी पेटवून झोपणे पडले महागात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
29 mins ago
सावधान! थंडीत शेकोटी पेटवून झोपताय : बेळगावात तिघांचा गुदमरून मृत्यू; एक गंभीर

बेळगाव :  सावधान! थंडी वाजतेय म्हणून शेकोटी पेटवून झोपताय, जरा जपून. थंडीपासून वाचण्यासाठी बेळगाव (Belagavi ) येथे कोळशाची शेगडी पेटवून चार युवक एका खोलीत झोपले. गुदमरून तिघेजण मृत्यू पावले (Three youths died of suffocation) तर एक युवक गंभीर आहे.

  शेगडीमधून बाहेर पडलेल्या कार्बन मोनोऑक्साईड वायूमुळे ऑक्सिजन मिळेनासा झाला व चारही युवक झोपेतच गुदमरले (suffocated ). 

बेळगाव येथील अमन नगर परिसरात १८ नोव्हेंबरला ही घटना घडली. संध्याकाळी थंडी लागू नये म्हणून चार युवक एका बंद खोलीत कोळशाची शेगडी पेटवून झोपले. त्यातील तिघे मृत्यू पावले.

त्यात रेहान माटे (२२ वर्षे), मोईन नालबंद (२३ वर्षे), सर्फराज हरपनहळ्ळी (२२ वर्षे) मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. शाहनवाज हरपनहळ्ळी (१९ वर्षे) याला गंभीर स्थितीत बेळगाव जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

शेगडीमधून बाहेर पडलेल्या कार्बन मोनोऑक्साईड वायूमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला व झोपेतच गुदरमल्याची प्राथमिक माहिती आहे.

यासंदर्भात माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेट, अमन सेट, पोलीस निरीक्षक बी. आर. गडेकर व आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अमननगर परिसरात घडलेल्या या धक्कादायक, वेदनादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा