मनी लॉन्ड्रिंग संबंधित कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली बॉंब स्फोटप्रकरणी (Delhi Car Bomb Blast) ईडीने (ED) मोठी कारवाई केली असून, दिल्लीच्या ओखला मधील अल फलाह ट्रस्ट (Al Falah Trust) व फरीदाबादमधील (Faridabad) अल फलाह विद्यापिठाशी (Falah Univesity) संबंधित २४ ठिकाणी धाड टाकण्यात आली.
मनी लॉन्ड्रिंग (Money Laundring) प्रकरणांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
विद्यापीठ व त्याच्याशी संबंधित मालक व व्यवस्थापन यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणांहून दस्तऐवज व डिजिटल पुरावे शोधण्यात येत आहेत.
मंगळवारी सकाळी ईडीने अल फलाह ट्रस्टचे ओखला येथील मुख्य कार्यालय, विद्यापिठ परिसर व व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींच्या खासगी राहत्या घरांसह अनेक ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या.
दिल्लीच्या ओखला विहार व जामिया नगर ते फरीदाबादच्या सेक्टर २२ मधील विद्यापीठ कॅम्पसपर्यंत ईडीने अनेक पथकानी या धाडी टाकल्या.
त्यात बरेच काही संशयास्पद सापडले असून, अल फलाह ग्रुपशी संबंधित ९ कंपन्यांची एकाच पत्त्यावर नोंदणी केल्याचे दिसून आले आहे.
प्राथमिक तपासात या कंपन्या शेल कंपन्या असाव्यात असे संकेत मिळाले आहेत. पत्ते दिले असले तरी त्याठिकाणी कार्यालये आढळलेली नाहीत.
वीज व पाण्याच्या वापराचा कोणताही रेकॉर्ड मिळत नाही. सापडलेल्या अनेक कंपन्यांसाठी एकच मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरण्यात आला होता.
इपीएफवो इएसआयसी मध्ये कोणओही फाइलिंग आढळले नाही. मात्र, कागदोपत्री या कंपन्या मोठ्या संस्था म्हणून दाखवल्या आहेत.
अनेक कंपन्यांमध्ये एक संचालक, अधिकृत सही करणारी व्यक्ती सामान्य असल्याचे आढळून आले. बॅंक स्टेटमेंटमध्ये पगार एकदम कमी असल्याचा दिसला. एचआर संबंधित कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नाहीत.
सर्व कंपन्या एकाच पद्धतीने तयार करण्यात आल्या होत्या. त्यांचे संपर्क तपशीलही सारखेच होते. तपासात अल फलाह ग्रुपने युजीसी व नॅक मान्यतेसंबंधी केलेल्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संस्थांकडून माहिती मागवली जात आहे.