२०३६ च्या ऑलिंपिकचे यजमानपद भारताला मिळणार

खासदार अनुराग सिंग ठाकूर यांचा विश्वास

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
२०३६ च्या ऑलिंपिकचे यजमानपद भारताला मिळणार

पणजी : भारताची (India) लोकसंख्या आणि पायाभूत सुविधा लक्षात घेता, २०३६ च्या ऑलिंपिकचे (Olympic)  यजमानपद भारताला मिळावे अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षी भारत या स्पर्धेसाठी बोली लावेल, असे माजी केंद्रीय क्रीडा मंत्री आणि खासदार (Member of Parliament) अनुराग सिंग ठाकूर (Anurag Singh Thakur) यांनी सांगितले.

गोव्यातील (Goa) हडफडे येथे जागतिक स्तरावरील फिडे ( FIDE)  बुद्ध‌िबळ स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

१.४ अब्ज लोकसंख्येसह, भारत हा चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारत आता अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर जाईल. क्रीडा तसेच इतर क्षेत्रांमध्ये नवीन सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

भारतीय ऑलिंपिक संघटना पुढील वर्षी २०३६ च्या ऑलिंपिकसाठी बोली मागवेल. भारत बोली सादर करेल आणि भारताला यजमानपद दिले जाईल.

क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पीय वाटप ८६ कोटी रुपयांवरून ३,४०० कोटी रुपयांवर गेले आहे. क्रीडा क्षेत्रातील खर्च ६०० कोटी रुपयांवरून ३,००० कोटी रुपयांवर गेला आहे.

देशात ११०० ‘खेलो इंडिया’ केंद्रे आहेत. गोव्यासह संपूर्ण देश जागतिक दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करत आहे. अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, सरकारच्या योग्य धोरणामुळे सर्व खेळांमध्ये नवीन खेळाडू निर्माण होत आहेत.



हेही वाचा