वास्को-कुळे-वास्को डेमू रेल्वे १ जानेवारीपर्यंत रद्द

लाईन ब्लॉक आणि पॉवर ब्लॉकच्या कामामुळे दक्षिण पश्चिम रेल्वेचा निर्णय

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
वास्को-कुळे-वास्को डेमू रेल्वे १ जानेवारीपर्यंत रद्द

मडगाव: वास्को, सांकवाळ आणि कांसावली या रेल्वे विभागादरम्यान लाईन ब्लॉक व पॉवर ब्लॉकचे महत्त्वाचे काम करावयाचे आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम रेल्वेने १८ नोव्हेंबरपासून ४५ दिवसांसाठी म्हणजेच १ जानेवारी २०२६ पर्यंत वास्को-कुळे-वास्को ही रेल्वेसेवा पूर्णपणे रद्द केलेली आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेने अधिसूचित केल्यानुसार, १८ नोव्हेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत वास्कोगामा-सांकवाळ-कांसावली विभागादरम्यान लाईन ब्लॉक आणि पॉवर ब्लॉकचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी रेल्वे क्रमांक ५६९६४ (वास्को ते कुळे) आणि रेल्वे क्रमांक ५६९६३ (कुळे ते वास्कोगामा) या दोन्ही सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर अशा ३१ दिवसांच्या कालावधीसाठी ही वास्को-कुळे-वास्को डेमू रेल्वे रद्द करण्यात आली होती.

हेही वाचा