
पणजी : सभापती (Goa Assembly Speaker) गणेश गावकर (Ganesh Gaonkar) यांनी आज सोमवारी दिल्लीत (Delhi) केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेऊन सावर्डे मतदारसंघातील विविध प्रकल्पांवर चर्चा केली.
विकासाबाबत मार्गदर्शन करतानाच सहकार्याचे आश्वासन दिल्याची माहिती सभापती गणेश गावकर यांनी दिली.
सीआरआयएफ अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधीबाबत चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्ग ७४८चे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. यावरही चर्चा झाली. जीएमएफसी धारबांदोडासह सावर्डे मतदारसंघात सीएसआर अंतर्गत प्रकल्प राबविण्यासाठी मदतीची मागणीही केली.