तेलंगणात आरटीसी बस, ट्रकची धडक : मृत्यूचा आकडा २०

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
तेलंगणात आरटीसी बस, ट्रकची धडक : मृत्यूचा आकडा २०

तेलंगणा : तेलंगणात (Telangana) सोमवार घात वार ठरला. येथील चेवेल्ला  मिरीजगुडा खानापूर रस्त्यावर टिप्पर ट्रक व आरटीसी बसची (Tipper Truck and RTC Bus)  धडक बसून झालेल्या अपघातात २० जण ठार झाले. एका तीन वर्षीय बालिकेचा मृतांमध्ये समावेश आहे. अपातात २० जण जखमी झाले आहेत व त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.  मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अपघातात सापडलेली बस तेलंगणा रस्ते वाहतूक मंडळाची (Telangana Road Transport Corporation) आहे. त्यात एकूण ७० हून अधिक प्रवासी होते. बस विक्रमाबाद जिल्ह्यातील तांदूर येथून बस हैद्राबाद येथे जात होती. खडी घेऊन जात असलेल्या ट्रकला बसची जोरदार धडक बसली व खडी बसगाडीत असलेल्या प्रवाशांवर कोसळली. अपघातात तीन महिन्यांची बालिका, तीन महिला व दोन्ही वाहनांचे चालक मिळून २० जण ठार झाले. २० जण जखमी झाले आहेत. 

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वटि करून माहिती दिली आहे. 

हेही वाचा