१५ दिवसांची मुदत

पणजी : वेदांत खाणीच्या (Vedant Mine) कामाचा मुळगाव (Mulgaon) गावावर काय परिणाम होणार याची माहिती सरकारने ग्रामस्थांना द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत (Gramsabha) केली आहे. यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे.
यासंदर्भात स्थानिकांना सतावत असलेल्या समस्यांचे एक निवेदन उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) व खाण कंपनीला दिले आहे. त्यात १५ मागण्यांचा समावेश आहे. त्यात शेतकऱ्यांना (Farmers) प्रलंबित भरपाई देणे, खाणकाम भाडेपट्ट्यांमधून घरे आणि इतर संरचना वगळणे इ्यादी मुद्यांचा समावेश आहे.
खाण लिज क्षेत्रातून घरे, पाणवठे, व मंदिरे वगळण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. इतर मुद्द्यांमध्ये भातशेतीतून गाळ काढणे, २०११ पासून प्रलंबित असलेली शेतकऱ्यांची भरपाई चुकती करणे, मुळगावच्या कोमुनिदादची थकबाकी भरणे यांचा समावेश आहे.
वेदांताच्या प्रतिनिधींसोबतची पूर्वीची बैठक अनिर्णीत राहिली होती. कारण कंपनीकडून नक्की उत्तर मिळाले नव्हते, असेही ग्रामस्थांनी ग्रामसभेत स्पष्ट केले.