दिवाळीनिमित्त सजल्या गोव्यातील बाजारपेठा; खरेदीसाठी लोकांची लगबग

वाहतूक कोंडीमुळे सारेच हैराण

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
दिवाळीनिमित्त सजल्या गोव्यातील बाजारपेठा; खरेदीसाठी लोकांची लगबग

पणजी : दिवाळीच्या खरेदसाठी शनिवारी पणजीसह राज्यातील विविध बाजारात मोठी गर्दी झाली होती. बाजारात आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाई माळा, रांगोळी, नरकासुराचे मुखवटे, कृत्रिम फुलांच्या माळा, सजावटीच्या अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी लगबग दिसून आली.  तसेच गावठी पोहे, साधे पोहे, कारीटे आदींची खरेदी देखील उत्साहात झाली.  बाजार परिसरासह बहुतेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. 

 



पणजी बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत विविध वस्तूंच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. तरीदेखील खरेदीचा उत्साह कायम होता. बाजारात दिवाळीसाठी आवश्यक असणारे गावठी पोहे  १०० ते १२० रुपये किलो दराने विकले जात आहेत. साध्या पोह्यांचा दर ७० रुपये किलो आहे. कारीटे २० रुपयांना ५ नग, आंबाडे ५० ला १० नग तर बत्तासे ३० रुपयांना ६ अशा दराने उपलब्ध आहेत. बेसन लाडू १६० रुपये डझन दराने विकले जात आहेत. तर रव्याच्या लाडूंची २०० रुपये डझन या दराने विक्री केली जात आहे. 


Small and medium mithai shops closing down as packaged sweets preferred  over traditional ones - The Economic Times


बाजारात आकाशकंदिलांचे दर आकार तसेच कलाकुसरीनुसार २०० ते १ हजार रुपयांपर्यंत आहेत. मातीच्या साध्या पणत्या ५० ते ८० रुपये डझन तर कलाकुसर केलेल्या पणती १५ ते ४० रुपये नग दराने विकली जात आहे. विद्युत रोषणाईच्या माळा २०० ते १५०० रुपयांना होती. कृत्रिम फुलांच्या माळा ३० ते १५० रुपयांना एक या दराने विकले जात आहेत. याशिवाय शनिवारी बाजारात मिठाई, भेटवस्तू, कपडे खरेदीसाठी गर्दी झाली होती. 


Buyers splurge as Diwali shopping makes grand return after Covid-induced  lull | Today News


शहरात वाहतूक कोंडी

शनिवारी सांतिनेज , १८ जून, एमजी रस्ता, आझाद मैदान परिसर, बांदोडकर रस्ता येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र बहुतेक ठिकाणी पोलीस अनुपस्थित होते. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यांवर पार्क करण्यात आली होती. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली.



हेही वाचा