गोव्याची फेणी आफ्र‌िकन देशांच्या पसंतीस

गोव्यातील ७६ टक्के मद्य जातेय आफ्र‌िकेतील दहा देशांत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
गोव्याची फेणी आफ्र‌िकन देशांच्या पसंतीस

 पणजी : गोव्यातील काजूची  फेणी (Goa cashew feni) आफ्रिकन (Africa) देशांना आकर्ष‌ित करीत आहे.  गोव्यातील मद्याची (Liquor) आफ्रिकन देशांत प्रचंड मागणी आहे.  आफ्रिकेतील दहा देश, कॅरिबियनमधील दोन देशांमध्ये गोव्याच्या मद्याची मोठी निर्यात होत आहे. गोव्यातून निर्यात केल्या जात असलेल्या ७६ टक्के दारूची निर्यात आफ्रिकन देशांमध्ये होत असल्याची माहिती कृषी आणि प्रक्रियाकृत उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (एमपीईडीए) दिली आहे.

एपीडीएच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै २०२५ ते २६ या चार महिन्यांच्या कालावधीत गोव्यातून सुमारे २.०८ मेट्र‌िक टन दारू निर्यात करण्यात आली आहे. या निर्यातीची किंमत जवळपास ३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे २५ कोटी रुपये) इतकी आहे. या दरम्यान गोव्यात १३ देशांमध्ये दारू निर्यात करण्यात आली. त्यापैकी १० आफ्रिकन देश तर कॅरेबियनमधील दोन देश क्युबा व जमैका तर आशियातील सिंगापूर या देशांचा समावेश आहे. 

सर्वाधिक दारूची निर्यात घानामध्ये झाली असून, घानाने १,०७९ मेट्र‌िक टन दारू आयात केली. या दारूची किंमत १४०.३ दशलक्ष शिलिंग एवढी आहे. त्यानंतर झांबियाने ३४५ मेट्रिक टन दारू आयात करून ४२.७ दशलक्ष शिलिंग किंमतीच्या दारूची निर्यात करण्यात आली.  तिसरी जागा कॉंगो देशाने पटकावली आहे. तेथे २५६ मेट्रिक टन दारू निर्यात करण्यात आली. त्याची किंमत २२.४ दशलक्ष शिलिंग एवढी आहे.

इतर देशांतील निर्यातीची आकडेवारी

क्युबात १६८ मेट्र‌िक टन (२१.३ दशलक्ष शिलिंग), नायजेरियात ४०.८ मेट्रिक टन (५.२ दशलक्ष शिल‌िंग), टांझानियात ४२०.७ मेट्रिक टन (५.१ दशलक्ष शिलिंग), सिंगापूर ८.७७ मेट्रिक टन (२.५ दशलक्ष शिलिंग), टोगो आणि बेनिन प्रत्येकी २६ मेट्र‌िक टन (२.४ दशलक्ष शिलिंग), अंगोला १९.९१ मेट्र‌िक टन (२.१ दशलक्ष शिलिंग), केनिया ११.२१ मेट्रिक टन (१.६ दशलक्ष शिलिंग), गॅबॉन ९.४५ मेट्रिक टन (१.६ दशलक्ष शिलिंग) असे हे प्रमाण आहे.