‘त्या’ प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या आकलना पलिकडच्या

पालकांचे काणकोण भागशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
‘त्या’ प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या आकलना पलिकडच्या

पैंगीण काणकोण (Canacona) येथे प्राथमिक शाळेतील (Primary school) तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी  (student) घेतलेल्या परीक्षेतील प्रश्न पत्रिकेत मुलांच्या विचार क्षमतेच्या पलीकडचे प्रश्न विचारल्याचा दावा पालकांनी केला आहे. यासंदर्भातील निवेदन भागशिक्षण अधिकारी यांना देण्यात आले आहे. प्राथमिक शाळेतील गणित, मराठी व परिसर अभ्यास या नमुना प्रश्नपत्रिका आणि परिक्षेसाठी आलेला पेपर खूप वेगळा होता, असे या निवेदनात म्हटले आहे. विद्यर्थ्यांचे हित लक्षात घेऊन यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.