पणजी : फार्मासी महाविद्यालयात अभाविप पुरस्कृत विद्यार्थी मंडळ विजयी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी : फार्मासी महाविद्यालयात अभाविप पुरस्कृत विद्यार्थी मंडळ विजयी

पणजी :  येथील फार्मासी महाविद्यालयात अखिल भारतीय ‌विद्यार्थी परिषदेने (अभाविप) पाठिंबा दिलेले विद्यार्थी मंडळ विजयी ठरले आहे. सरचिटणीस म्हणून व्रुषभ नाईक बिनविरोध निवडून आले आहेत. पाच पैकी पाचही जागांवर अभाविप पुरस्कृत उमेदवारांनी विजय मिळवला आहे. 

सरचिटणीस : व्रुषभ नाईक (बिनविरोध), सांस्कृतीक सचिव : पुर्वी परब, क्रीडा सचिव : सिद्धेश शेटकर, मॅगझिन सचिव : सानिया शेटगांवकर, महिला प्रत‌िनिधी : प्रांजली गाड यांची निवड झाली आहे. 

पणजी येथील फार्मासव महाविद्यालयावर अभाविपने पाच ही जिंकत आपला झेंडा फडकावला आहे. यासंदर्भात माहिती देताना विद्यार्थी परिषदेचे अॅड. यश कटंक यांनी सांगितले की, एकूण हा विजय म्हणजे विद्यार्थ्यांचा अभाविप वर असलेला विश्वास दर्शवत आहे. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असलेली आमची बांधिलकी यातून दिसून येत आहे.  चांगले कॅम्पस वातावरण निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.