पणजी : साहित्य अकादमीच्या (Sahitya Academy) लेखकांसाठी असलेल्या प्रवास अनुदान योजनेसाठी या वर्षी समिक्षा नागेश शेट शिरोडकर यांची निवड झाली आहे. नवोदित लेखक (writer) म्हणून त्यांना गुजरात येथे जाण्याची संधी मिळाली. डिसेंबर महिन्यात गुजरातमधील लेखकांना त्या भेटणार तसेच या प्रवासादरम्यान समिक्षा नागेश शेट शिरोडकर यांनी गुजरात राज्यातील विविध शैक्षणिक तसेच साहित्यिक संस्थांना भेट देणार आहेत. ही योजना दरवर्षी प्रत्येक राज्यातून एका युवा लेखकाला दिली जाते. यावर्षी गोव्याच्या समिक्षा नागेश शेट शिरोडकर यांची निवड झाली.
समिक्षा नागेश शेट शिरोडकर यांनी “अंतरंग” हे कोकणी निबंधांचे (konkani ) पुस्तक (Book) प्रकाशित केले आहे. त्या एम.ए. (कोंकणी), एम.ए. (मराठी) आणि बी.एड. पदवी प्राप्त केली असून सध्या त्या श्री विजयानंद उच्च माध्यमिक विद्यालय, मये येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्या कोंकणी सेवा केंद्र साखळी, डिचोली कोंकणी सेवा केंद्र, आणि सम्राट क्लब मये, या संस्थांच्या सक्रिय सदस्य आहेत. तसेच साहित्य मंथन सत्तरी या वर्षाच्या सचिव म्हणूनही त्या कार्य करतात. त्यांचे लेखन मराठी तसेच कोकणी वर्तमानपत्रांतून प्रकाशित झाले असून त्यांनी विविध कोकणी कार्यशाळांमध्ये आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांनी विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तसेच परीक्षक म्हणूनही कार्य केले आहे.
समिक्षा शेट शिरोडकर यांना गोवा कोकणी अकादमीची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांनी लेखक अशोक कामत यांच्या “घणाघाय नियतीचे” या कादंबरीतील समाजचित्रण या विषयावर संशोधननिबंध सादर केला आहे.
त्यांना गोवा राज्य सामाजिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता साहित्य अकादमीच्या वतीने लेखकांसाठी असलेल्या प्रवास अनुदान योजनेसाठी युवा लेखक म्हणून गुजरात भेटीसाठी त्यांची निवड झाली आहे.