एकतादिनानिमित्त क्रीडा खात्यातर्फे आयोजन; पाच गटात होणार दौड
पणजी : राज्य क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने (Directorate of sports and Youth Affairs) ‘राष्ट्रीय एकता दिना’निमित्त (Rashtriya Ekta Diwas) ३१ ऑक्टोबर रोजी ‘एकता दौड’ (Unity Run) आयोजित केली आहे. एकूण पाच गटात होणार असून, सकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.
गटवारी खालीलप्रमाणे
१० वर्षांवरील व १४ वर्षांखालील (मुले व मुली), ३ किमी दौड, पणजीतील इंडोर स्टेडियम कांपाल ते विज्ञान केंद्र मिरामार ते परत
१४ वर्षांवरील व १८ वर्षांखालील, मुले व मुली, ५ किमी दौड, इंडोर स्टेडियम कांपाल ते करंझाळे पेट्रोल पंप व परत
दिव्यांगजन, २ किमी दौड, इंडोर स्टेडियम कांपाल ते दोनापावला सर्कल व परत
ज्येष्ठ नागरिक, ६० वर्षे व त्यावरील, ५ किमी दौड, इंडोर स्टेडियम कांपाल ते करंझाळे पेट्रोल पंप व परत.
सहभागी झालेल्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी कांपाल, पणजीतील मल्टीपर्पज इंडोर स्टेडियमजवळ सकाळी पोचणे गरजेचे आहे. याठिकाणी टीशर्ट दिले जातील. ‘युनिटी रन’ हा गुगल अर्ज भरून प्रवेश घ्यावा. २२ ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक शारिरीक शिक्षण अधिकारी राजू पवार यांना ८४०८०९१०६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.