गोवा कर्मचारी भरती आयोगाची 'सीबीटी' परीक्षा : ६५ पदांसाठी ९ हजार उमेदवार उतरणार मैदानात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd October 2025, 05:52 pm
गोवा कर्मचारी भरती आयोगाची 'सीबीटी' परीक्षा : ६५ पदांसाठी ९ हजार उमेदवार उतरणार मैदानात

पणजी: कर्मचारी भरती आयोगामार्फत (SSC) अकाउंटंट, असिस्टंट स्टेट टॅक्स ऑफिसर आणि स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या ६५ पदांसाठी ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी पहिली संगणक-आधारित परीक्षा (CBT) आयोजित करण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परीक्षांना सुमारे ९ हजार उमेदवार बसणार आहेत.

आयोगाने १८ जुलै २०२५ रोजी या ६५ पदांसाठी जाहिरात दिली होती. यामध्ये अकाउंटंटची २२ पदे, असिस्टंट स्टेट टॅक्स ऑफिसरची ९ पदे आणि स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची ३४ पदे भरली जाणार आहेत. या तिन्ही पदांसाठी जवळपास ९ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

ही परीक्षा दोन दिवस चार तुकड्यांमध्ये विभागून घेतली जाईल. उमेदवारांना ६० गुणांच्या पेपरसाठी ७५ मिनिटांचा वेळ दिला जाईल, तर दिव्यांग उमेदवारांना अतिरिक्त २० मिनिटे मिळतील. परीक्षा केंद्रांची माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे हॉल तिकिटासोबत पाठवण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रांची माहिती

उत्तर गोवा: आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आसगाव) आणि सेंट झेवियर्स महाविद्यालय (धुळेर - म्हापसा) येथे परीक्षा होईल.

दक्षिण गोवा: डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय (फातोर्डा), रोजरी महाविद्यालय (नावेली) व एनआयटी (कुंकळ्ळी) येथे परीक्षा होईल.

हेही वाचा