चिमुकलं वय, मोठ्या वेदना

या मुलांच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? त्यांची घरची गरिबी? की आपल्या समाजातील उदासीनता? मला वाटतं, आपण सगळेच कुठेतरी जबाबदार आहोत. मोठमोठ्या इमारती बांधताना, हॉटेल्समध्ये काम करताना आपण त्यांच्याकडे केवळ 'कामगार' म्हणून पाहतो, त्यांच्यातील 'बालक' म्हणून नाही.

Story: ललित |
20th September, 12:05 am

युष्याच्या पदरी दारिद्र्य आले‌ त्यांच्या, 

ज्यांच्या दारिद्र्याचा मार्ग त्यांच्या मुलांना पत्कारावा लागला...

लहान वयात न शिकता, पुस्तकांना स्पर्श न करता, फक्त गरीबीत पडून राहून जीवन जगण्याचा दुःखी अनुभव ती मुले घेतात जी 'बालमजुरी' करतात. पोटाची भूक भागविण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना मदत करण्यासाठी चिमुकली मुले मजुरी करत रस्त्याच्या दिशेने फिरत असतात. 

जीवन त्यांचे अर्थहीन असते आणि मन त्यांचे रडत असते. कारण त्यांच्या दिवसाची सुरुवातच मजुरीच्या स्पर्शाने होते. पायांमध्ये चपला न घालता ही मुले रस्त्यावर मजुरीसाठी फिरतात. जमिनीवर पडलेल्या अन्नाचा कण पोटात घालतात. त्यांना सुखाचे क्षण अनुभवता येत नाहीत आणि दुःखाची छाया त्यांच्या जीवनापासून दूर जात नाही.

घरातील दबावामुळे किंवा घरातील परिस्थितीमुळे चिमुकली मुले मजुरीचे काम करतात. त्यांच्या मनातील भावना समजून न घेता परंपरेने चालत आलेल्या प्रथेचे ओझे लहान चिमुकल्यांवर सोपविले जाते. बालमजुरी करणारी ही मुले कधी रस्त्यावर मजुरीसाठी फिरताना गाड्यांमुळे तर कधी संपर्कात येणाऱ्या लोकांमुळे स्वत:च्या जीवाला घात पोचवतात. कधी मजुरी करताना गाड्यांमध्ये सापडतात तर कधी मजूरी मागितल्याने लोकांकडून वाईट शब्द बोलून घेतात. दिवसरात्र काबाडकष्ट करुन प्रत्येक दिवशी छोटीशी कमाई मिळवून त्यातच सुख मानतात.

बालमजुरी करणे इतके सोपे नसते. सामान्य माणसाला जे सुख एका छोट्या घरात राहून, सर्व सुविधांचा वापर करून मिळते ते त्यांना मिळत नसते. मोठमोठ्या लोकांच्या हाती काम करताना बालमजूर वर्ग त्यांच्याकडून वाईट शब्द ऐकून सहन करतात. परंतु मजुरी करून पोटाची खळगी भरणारे आणि मजुरीमध्येच आपले जीवन व्यापलेले आहे याची जाण असलेला बालमजूर वर्ग लोकांचे वाईट बोल ऐकून ते सोसत असतो. 'देवाने सर्वांना समान जीवनाचा आनंद दिलेला नाही'. कदाचित याच विचारातून मजूर वर्ग जीवन जगत असतात असे वाटते.

या मुलांच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? त्यांची घरची गरिबी? की आपल्या समाजातील उदासीनता? मला वाटतं, आपण सगळेच कुठेतरी जबाबदार आहोत. मोठमोठ्या इमारती बांधताना, हॉटेल्समध्ये काम करताना आपण त्यांच्याकडे केवळ 'कामगार' म्हणून पाहतो, त्यांच्यातील 'बालक' म्हणून नाही. त्यांचे हक्क, त्यांच्या भावना, हे सर्व आपण सोयीस्करपणे 

विसरतो.

आज आधुनिकतेच्या या जगात जेव्हा आपण बालमजुरी करणाऱ्या मुलांना पाहतो तेव्हा डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. कारण आज जरी समाजाने आधुनिकतेची कास धरून, नवे बदल स्वीकारले असले तरीही बालमजुरांचा प्रश्न सुटेल की नाही हा एक महत्वाचा मुद्दा उभा राहतो.

आरामदायक जगणे, सगळ्या इच्छा आकांक्षांची पूर्ती करणे हा हक्क बालमजुरांना नसतो. आज बालमजूर फक्त कष्ट करून पोटाचा विचार करत तरतरत्या उन्हात काम करतात. अनेक लोक या मजूर वर्गाचा गैरवापर करतात. माणुसकीची वागणूक त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांचा हा बालमजुरी करण्याचा धंधा कधी सुटेल का? आणि जर सुटलाच तर बिचाऱ्या बालमजुरांना त्यातून मुक्ती मिळेल का? याचा विचार करणे महत्वाचे 

ठरते.

कारण शेवटी, पूर्वीपासून ठेवले त्यांना हक्कापासून दूर.. म्हणूनच त्यांच्या नशिबी आला बालमजुरीचा पूर...


पूजा भिवा परब

 पालये, पेडणे