रोनाल्डो एएफसी चॅम्पियन्स लीग २ खेळणार; अल-नासरने स्क्वॉडमध्ये केले समाविष्ट

एफसी गोवाशी गोव्याच्या धर्तीवर भिडणार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th September, 02:51 pm
रोनाल्डो एएफसी चॅम्पियन्स लीग २ खेळणार; अल-नासरने स्क्वॉडमध्ये केले समाविष्ट

पणजी : सौदी अरेबियाचा बलाढ्य फुटबॉल क्लब अल-नासरने सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याची अधिकृतपणे एएफसी चॅम्पियन्स लीग २ (AFC Champions League 2) साठी नोंदणी केली आहे. या स्पर्धेच्या ड्रॉमध्ये अल-नासर क्लबचा संघ एफसी गोवा सोबत एकाच गटात असल्याने, रोनाल्डो गोव्यात खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रोनाल्डोसारखा जागतिक फुटबॉलपटू गोव्याच्या मैदानात उतरू शकतो, या बातमीने फुटबॉल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. यामुळे आगामी सामन्यांबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, सर्वांचे लक्ष आता या संभाव्य सामन्याकडे लागले आहे.