पणजी बसस्थानकावरील घटना; सर्वजण सुखरूप, वाहनांचे किरकोळ नुकसान.
पणजी : पणजी बसस्थानकावर कदंब परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसने नियंत्रण गमावल्याने उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानकात येताना कदंब बस अचानक आपल्या मार्गावरून भरकटली आणि तिने बसस्थानकाजवळ पार्क केलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. अपघातामुळे वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
या अपघागाचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. तांत्रिक बिघाड किंवा चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ज्या वाहनमालकांचे नुकसान झाले आहे, ते भरपाईसाठी कदंब परिवहन महामंडळाशी संपर्क साधत आहेत.