अमेरिकेतील लोकप्रिय न्यायमूर्ती फ्रँक कॅप्रियो यांचे निधन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st August, 11:52 am
अमेरिकेतील लोकप्रिय न्यायमूर्ती फ्रँक कॅप्रियो यांचे निधन

न्यू यॉर्क : आपल्या हृदयस्पर्शी निर्णयांमुळे आणि आपुलकीच्या स्वभावामुळे जगभरातील लोकांची मने जिंकणारे न्यायमूर्ती फ्रँक कॅप्रियो यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत निधन झाले. ते अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड्स आयलंड येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.



निवृत्तीनंतरही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमानसाशी जोडलेले राहिले. करुणा, विनम्रता आणि माणसातील चांगुलपणावर असलेली त्यांची दृढ श्रद्धा यामुळे त्यांनी लाखो लोकांच्या हृदयात घर केले. त्यांच्या कार्यातून आणि मानवतेच्या आदर्शातून त्यांनी असंख्यांना प्रेरणा दिली.



त्यांचा आपुलकीचा स्वभाव, विनोदबुद्धी आणि दयाळूपणा यामुळे त्यांना ओळखणाऱ्यांवर कायमची छाप पडली, असे त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर लिहिले. ते केवळ न्यायमूर्ती म्हणूनच नव्हे तर प्रेमळ पती, वडील, आजोबा, पणजोबा आणि खरा मित्र म्हणून सदैव स्मरणात राहतील, असे त्यांच्या मुलगा डेव्हिड कॅप्रियो यांनी नमूद केले.

हेही वाचा