ज्युडो इंटर कॉलेजिएट अजिंक्यपद २०२५-२६
पणजी : गोवा विद्यापीठामार्फत पुरुष आणि महिला विभागासाठी ज्युडो इंटर कॉलेजिएट अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत गोवा विद्यापीठाच्या जुबिली हॉल येथे पार पडली. महिला गटात व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज, मिरामारने अजिंक्यपद पटकावले, तर रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, नावेलीने उपविजेतेपद मिळवले. तृतीय स्थान पाद्रे कॉन्सेसाओ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेर्णा आणि व्ही. व्ही. एम.चे श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मडगाव यांनी संयुक्तरीत्या मिळवले.
पुरुष गटात व्ही. व्ही. एम. श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मडगाव हे अजिंक्य ठरले, तर व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज, मिरामारने उपविजेतेपद मिळवले. तृतीय स्थान कुंकळ्ळीम एज्युकेशनल सोसायटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कुंकळ्ळी आणि रोझरी कॉलेज, नावेली यांनी संयुक्तरीत्या मिळवले.
सर्वोत्कृष्ट पुरुष ज्युडोका दर्शन नाईक (डॉन बॉस्को कॉलेज, पणजी) व सर्वोत्कृष्ट महिला ज्युडोका ज्युलिएट वर्गीस (गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी) ही ठरली.
मुख्य अतिथी म्हणून डॉ. वनिता पाटील (वित्त अधिकारी/कार्यभार, गोवा विद्यापीठ व सहयोगी प्राध्यापिका, सरकारी महाविद्यालय साखळी), मान्यवर अतिथी म्हणून मीर डायस (ज्युडो प्रशिक्षक, गोवा क्रीडा प्राधिकरण) आणि भालचंद्र बी. जदार (सहायक संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा, गोवा विद्यापीठ) उपस्थित होते. यांच्याहस्ते विजेत्यांना पदके व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
पुरुष गटातील निकाल : ६० किलोपर्यंत: दर्शन नाईक (डॉन बॉस्को कॉलेज, पणजी), निप्पू यादव (पी. ई. एस. रवी नाईक कॉलेज, फर्मागुडी), मोहित चव्हाण (डी. एम. कॉलेज अँड रिसर्च सेंटर, असगाव), अयान खान (शासकीय महाविद्यालय, पेडणे), ६६ किलोपर्यंत : शशिधर लमाणी (सी. ई. एस. कॉलेज, कुंकळ्ळी), कार्तिक गौदार (एस. पी. ई. एस. गोवा मल्टी-फॅकल्टी कॉलेज, धारबांदोडा), राजीब सरकार (शासकीय महाविद्यालय, पेडणे), दक्ष नाईक (धेंपो कॉलेज, मिरामार). ७३ किलोपर्यंत : रोहन गावकर (श्री दामोदर कॉलेज, मडगाव), अरिफ नव्हार (श्री दामोदर कॉलेज, मडगाव), योहान मकानदार (शासकीय महाविद्यालय, साखळी), दिवाकर यादव (सी. ई. एस. कॉलेज, कुंकळ्ळी). ८१ किलोपर्यंत : राम माळिंगकर (गोवा कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, जुने गोवे), वेदर्श मल्हार (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज), ऐकान पठाण (शासकीय महाविद्यालय, साखळी), रीगन कार्डोसो (रोझरी कॉलेज, नावेली).
९० किलोपर्यंत : बिरू सिंग (रोझरी कॉलेज, नावेली), प्रवीण बुरांगी (शासकीय महाविद्यालय, साखळी), मार्विन नाझरेथ (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज), मार्क सूझा (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज).
१०० किलोपर्यंत : अद्वैत कुमार (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज), उसईद खान (श्री दामोदर कॉलेज, मडगाव), समर्थ चुर्मुरी (जी. व्ही. एम. कॉलेज, फर्मागुडी), खलंदर शेख (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज).
१०० किलोपेक्षा जास्त : नियाज शेख (श्री दामोदर कॉलेज, मडगाव), समून खान (शासकीय महाविद्यालय, केपे), ऋषव सिंग (स्वामी विवेकानंद कॉलेज, बोरी), अयेश जमादार (गोवा मल्टी-फॅकल्टी कॉलेज, धारबांदोडा.
महिला गटातील निकाल : ४८ किलोपर्यंत : तनिष्का शिवोलकर (डॉन बॉस्को कॉलेज, पणजी), सर्निशा तिवरेकर (शासकीय महाविद्यालय, खांडोळा), मीझबा नसर्गी (रोझरी कॉलेज, नावेली), अहलिया हुसेन (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज).
५२ किलोपर्यंत : ज्युलिएट वर्गीस (गोवा मेडिकल कॉलेज, बांबुळी), गौतमी नार्वेकर (शासकीय महाविद्यालय, खांडोळा), जोया खादायत (रोझरी कॉलेज, नावेली), शाझा शेख (एस. एस. धेंपो कॉलेज, कुजिरा).
५७ किलोपर्यंत : कल्पिता नाईक (रोझरी कॉलेज, नावेली), सुमन यादव (रोझरी कॉलेज, नावेली), समीक्षा दहीफोडे (शासकीय महाविद्यालय, केपे), पूजा नाईक (पाद्रे कॉन्सेसाओ कॉलेज, वेर्णा). ६३ किलोपर्यंत : ईशा फर्नांडिस (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज), रियंशा नाईक (एस. एस. ए. शासकीय महाविद्यालय, पेडणे), सुहाना परवार (विद्याप्रबोधिनी कॉलेज), संस्कृती अामोणकर (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज).
७० किलोपर्यंत : अदिती सादेकर (पी. सी. सी. ई. कॉलेज, वेर्णा), नंदिनी भजनत्री (रोझरी कॉलेज, नावेली), कृपा नाईक (शासकीय कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, खांडोळा), श्रुती शिंदे (गोवा मल्टी-फॅकल्टी कॉलेज, धारबांदोडा).
७८ किलोपर्यंत : प्रीती कलमकर (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज), जिनाथ सय्यद (गोवा मल्टी-फॅकल्टी कॉलेज, धारबांदोडा), कृतीका नाईक (श्री दामोदर कॉलेज, मडगाव), वलिशा रेबेलो (रोझरी कॉलेज, नावेली).
७८ किलोपेक्षा जास्त वजनी गटात नुमा प्रथम
नुमा सुब्बा (श्री दमोधर कॉलेज, मडगाव), इराम खत्री (व्ही. एम. साळगावकर लॉ कॉलेज), कृतीका नाईक (श्री दामोदर कॉलेज, मडगाव), वलिशा रेबेलो (रोझरी कॉलेज, नावेली) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ बक्षीस प्राप्त झाले.