पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात होत आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेसह खात्यांच्या मागण्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठी तीन स्वतंत्र विधेयके अधिवेशनात येणार आहेत. यावर सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा होण्याची अपेक्षा आहे. अधिवेशनासाठी ७८९ तारांकित तर ३,३३० अतारांकित प्रश्न आले आहेत. लॉटरी पद्धतीने प्रश्न चर्चेला येतील. याशिवाय शून्यप्रहर, लक्षवेधी सूचना असतील. मुख्यमंत्री कामकाज सल्लागार समितीचा अहवाल सभागृहात सादर करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरही चर्चा होणार आहे.
सत्ताधारी आमदारांचे सभागृहात मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे प्रश्न मांडण्यासह चर्चेवेळीही त्यांना अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. सभागृहातील रणनीती ठरवण्यासाठी सरकारला पाठिंबा दिलेल्या आमदारांची नुकतीच बैठक पार पडली. त्या बैठकीत रणनीती निश्चित झाली आहे.
LIVE : 🔴(अपडेटसाठी पेज रिफ्रेश करा.)
दुपारी १:३० : रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना ‘टेम्पररी स्टेटस’
सरकारी खाती, महामंडळे, पालिकांमध्ये काम करणाऱ्या सर्व रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना मिळेल लाभ. २१८०० रूपये वेतन व इतर लाभ. यापुढे रोजंदारीवर भरती नाही. सरकारी खाती, महामंडळे, पालिकांमध्ये काम करणाऱ्या सर्व रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना मिळेल टेम्पररी स्टेटस. १ ऑगस्टपासून लाभ. यापुढे रोजंदारीवर भरती नाही : डॉ प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दुपारी १२: ३५ : दाबोळी विमानतळाचा मुद्दा तापला.
दाबोळी आणि मोपावरून दर दिवशी सरासरी ५० विमाने ये-जा करतात. मोपाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत ६५.८८ कोटी जमा. तर दाबोळीत साधन सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. सरकारला दाबोळी विमानतळ बंद करायचा नाही : मुख्यमंत्र्यांचे लोबोंना उत्तर.
दुपारी १२:१५ : तर धोरणात बदल करू!
हाऊसिंग बोर्डच्या जागांसाठी गोव्यातील वास्तव्याचा ३० वर्षांचा दाखला आवश्यक. सध्या ई-लिलावात श्रीमंतांनाच जागा मिळत असतील तर धोरणात बदल करणारः डॉ प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
आमदार उल्हास तुयेकर यांनी गोवेकरांना दर परवडणारे नसल्यामुळे हाऊसिंग बोर्डाच्या लिलावाची पद्धत बदलण्याची केली होती मागणी.
दुपारी १२.०० : गृह निर्माण मंडळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
विचारलेला प्रश्न व मिळालेल्या उत्तरात तफावत. पीएम आवास योजने अंतर्गत २४० घरांचे बांधकाम केल्याची माहिती. तर, एकही घर बांधले नसल्याचे विधानसभेत उत्तर : व्हेंझी व्हिएगस; आमदार बाणावली.
२०११च्या जनगणेनेनुसार पीएम आवास योजनेसाठी काही गोमंतकीय पात्र होते. त्यावर फेरविचार करण्याची केंद्राकडे मागणी. यासाठी पेडणे येथे जागा शोधण्यासाठी जिल्हाधिकऱ्यांना सूचित करण्यात आले आहे : गृह निर्माण मंडळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर.
सकाळी ११.५० : तसा रीतसर प्रस्ताव येणे गरजेचे!
चोडण पंचायत व स्थानिकांचा रो रो फेरीला विरोध असल्यास जुन्याच ६ फेरीबोटी चालवण्याची सरकारची तयारी. मात्र सरकारकडे पंचायत व स्थानिकांकडून तसा रीतसर प्रस्ताव येणे आवश्यक : सुभाष फळदेसाई, नदी परिवहन मंत्री.
सकाळी ११.४० : तारांकित प्रश्नाला अतारांकित केले; युरी चवताळले!
कोळशाच्या प्रश्नावरून विधानसभेत गोंधळ. तारांकित प्रश्नाला अतारांकितात केल्याचा मुद्द्यावरूव विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आक्रमक. हा ३ ते ४ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी केला.