पोलीस तपास सुरू
पणजी : चांदर परिसरात रविवारी पहाटे घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली. अज्ञात चोरट्यांनी स्थानिक रहिवासी निकोलस डिकोस्टा यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लुटून नेल्याची माहिती पुढे आली आहे.
निकोलस डिकोस्टा (७५) हे मित्रांना भेटण्यासाठी बाहेर गेले होते. पहाटे १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांनी काही आवाज ऐकला. ते घराबाहेर असता असता, आधीपासून निवासस्थानाच्या आवारात दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. नंतर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले.
चोरट्यांनी डिकोस्टा यांच्याकडील चार सोन्याच्या साखळ्या, एक ब्रेसलेट, अंगठ्या आणि रोकड असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. या हल्ल्यात डिकोस्टा जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर कुंकळ्ळी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तात्काळ छडा लावण्याची मागणी केली जात आहे.
(बातमी अपडेट होत आहे)