२६ जानेवारीपूर्वी तुये हॉस्पिटल सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन!

जाहीर सभेत इशारा : जीएमसीसोबत जोडण्याची मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
5 hours ago
२६ जानेवारीपूर्वी तुये हॉस्पिटल सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन!

पेडणे : तुये येथील हॉस्पिटल बांबोळीतील जीएमसीतील हॉस्पिटलला लिंक करावे. २६ जानेवारीपूर्वी हे हॉस्पिटल सुरू करावे, ८० टक्के नोकऱ्या येथील स्थानिकांना द्याव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात यईल, असा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीने आयोजित जाहीर सभेत दिला.

हॉस्पिटल परिसरात आयोजित केलेल्या सभेला काँग्रेसचे नेते देवेंद्र प्रभुदेसाई, पंच तथा अॅड. अमित सावंत, गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, पंच बाळा उर्फ प्रशांत नाईक, तुये हॉस्पिटल कृती समितीचे तुळशीदास राऊत, संजय राऊत, जोज लोबो, अॅड. प्रसाद शहापूरकर आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांबरोबरच युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या जाहीर सभेमध्ये प्रमुख मुद्दे मांडण्यात आले. हॉस्पिटल इमारत अजूनपर्यंत आरोग्य खात्याकडे सुपूर्द केलेली नाही. येत्या विधानसभा अधिवेशनात आम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.