पालकमंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती; डिजिटल विस्ताराची घोषणा
प्रुडंट मीडियाचे संचालक ज्यो लुईस, संपादकीय संचालक प्रमोद आचार्य, प्रुडंट मीडियाचे संपादक सुयश गावणेकर, डिजीएम रवींद्र पाटील यांसह कोकणसादची टीम.
सावंतवाडी : ‘दै. कोकणसाद’चा ३६ वा वर्धापनदिन सोहळा रविवारी (दि.२०) थाटात पार पडला. यावेळी कोकणसाद टीमच्या वतीने झाराप येथील हॉटेल आराध्य याठिकाणी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी, सकाळी श्री देव उपरलकर, श्री देव पाटेकर, श्री विठ्ठल मंदिर आणि श्री देव महापुरुषचे दर्शन घेऊन वर्धापनदिन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी दै. कोकणसाद आणि कोकणसाद LIVEचे संपादक संदीप देसाई, चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम, मार्केटिंग मॅनेजर समीर सावंत, स्वप्निल परब, जुईली पांगम, उपसंपादक रवींद्र जाधव, उपसंपादक लक्ष्मण आडाव, उपसंपादक भगवान शेलटे, प्रसाद कदम, मयुरेश राऊळ, मुख्यालय प्रतिनिधी लवू म्हाडेश्वर, वितरण प्रतिनिधी आश्पाक शेख, वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब, वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे, दोडामार्ग प्रतिनिधी लवू परब, कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर, कुडाळ प्रतिनिधी नीलेश ओरोसकर, देवगड प्रतिनिधी नागेश दुखंडे, अविनाश बांदेकर, मयुरेश राऊळ, आयटी साहाय्यक मेघनाथ सारंग, डिझायनर सर्वेश गावकर, तन्वी नाईक उपस्थित होत्या. हॉटेल आराध्य येथे झालेल्या वर्धापनदिन सोहळ्यात दै. कोकणसादच्या आत्तापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी हॉटेल आराध्य येथे झालेल्या स्नेहमेळाव्यात प्रुडंट मीडियाचे संचालक ज्यो लुईस, संपादकीय संचालक प्रमोद आचार्य, प्रुडंट मीडियाचे संपादक सुयश गावणेकर, डिजीएम रवींद्र पाटील, प्रुडंट नेटवर्कचे डिजिटल हेड रोहित वाडकर उपस्थित होते. यावेळी प्रुडंट मिडियाचे संचालक ज्यो लुईस यांनी डिजिटल मीडियातील क्रांतीबाबत मार्गदर्शन केले. शिवाय लवकरच ‘कोकणसाद LIVE’ कोकणसाद डिजिटल या नावाने लोकांसमोर येणार असल्याचे सांगितले. तसेच कोकणात रत्नागिरीतही दै. कोकणसाद आपला विस्तार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रुडंट मीडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर किरण गोगटे यांनी डिजिटल मीडियाबाबत माहिती दिली.
‘दै. कोकणसाद’ जिल्ह्याचे मुखपत्र : नितेश राणे
सिंधुदुर्गच्या विकासाचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून ‘दै. कोकणसाद’ची वाटचाल सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून कोकणसाद पुढे येत आहे. या वृत्रपत्राची विश्वासार्हता आणि विकासाचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. सिंधुदुर्गातील तरुणांत एवढे टॅलेंट आहे, ते अशा कार्यक्रमांमधूनच कळते. एकंदरीत ‘युवा प्रेरणा’ या संकल्पनेतून कोकणसादने जिल्ह्यातील यशवंत तरुणाईचा केलेला गौरव जिल्ह्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.