फातोर्ड्यात मदतीसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसालाच मारहाण

चालकाविरोधात गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th July, 08:36 pm
फातोर्ड्यात मदतीसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसालाच मारहाण

मडगाव : आर्लेम फातोर्डा येथे दुचाकीवरुन पडलेल्या चालकाला मदतीसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाणीचा प्रकार घडला. दारुच्या नशेत असताना संशयित सिमोन बोर्जेस (४६, रा. राय) याने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. तक्रार दाखल झाल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

मारहाणीचा हा प्रकार मंगळवारी घडला होता. संशयित सिमोन बोर्जेस हा आपल्या ताब्यातील बुलेटवरुन घोगळ येथून आर्लेम फातोर्डाच्या दिशेने जात होता. आर्लेम येथे सिमोन याचा गाडीवरील ताबा सुटून तो रस्त्यावर खाली पडला. यावेळी आर्लेम सर्कलनजीक ड्युटीवर असणार्‍या वाहतूक पोलीस पुंडलिक राठोड यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. मद्याच्या नशेत असलेल्या सिमोन याने शिवीगाळ करीत वाहतूक पोलिसालाच मारहाण केली. या प्रकरणी पुंडलिक राठोड यांच्याकडून फातोर्डा पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार नोंद करण्यात आली. त्यानुसार फातोर्डा पोलिसांनी संशयित सिमोन बोर्जेस याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक नाथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा