अनमोड घाटातील भेगा पडलेला रस्ता अखेर खचला

घाटातून वाहतूक करणे धोक्याचे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
अनमोड घाटातील भेगा पडलेला रस्ता अखेर खचला

जोयडा : अनमोड घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती येतेय. मोलेपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेला अनमोड घाटातील भेगा पडलेला रस्ता अखेर शुक्रवारी रात्री खचला. रस्ता खचल्याने घाटातून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे.


अनमोड घाटावरील दूधसागर मंदिराच्या खालच्या बाजूला हा रस्त्याला भेगा पडल्या होत्या. त्यामुळे काल शुक्रवारी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातून बॅरिकेट्स घालून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. तसेच तडे गेलेल्या ठिकाणी काँक्रिट घालण्यात आले होते. मात्र तरीही रात्री रस्ता खचण्याची घटना घडली. 


भेगा पडलेल्या ठिकाणी उपाययोजना म्हणून खालच्या बाजूला नव्याने संरक्षक भिंत उभारण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, पाऊस पडत असल्याने त्या कामात अडथळा निर्माण होत होता, आणि अशातच रात्री रस्ता खचण्याची घटना घडली आहे. 

हेही वाचा