गस्तीवरील पोलिसांचे प्रसंगावधान; दोरी, लाईफ जॅकेटच्या सहाय्याने चौघांना वाचवले
बांदाः मुंबई- गोवा महामार्गावर बांदा बसस्थानकानजीक असलेल्या पुलावरून भरधाव वेगात जात असलेली क्रेटा कार (एमएच ०७ एजी ०००४) बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पुलापासून डिव्हायडरवर चढली व स्ट्रीट लाईटचा पोल तोडून पोलवरून सुमारे ६० फूट खोल ओहळात कोसळली.
सदर कार सावंतवाडीहून गोव्याच्या (Goa) दिशेने जात होती. या गाडीत सावंतवाडी येथील चार प्रवासी होते. सुदैवाने गाडीचे सनरुफ उघडल्याने हे चारही जण बचावले. सनरुफ उघडल्याने एकाने बाहेर येत महामार्गांवरून जाणाऱ्या गाड्यांना मदतीसाठी विनवणी केली. दरम्यान अन्य तिघेजण गाडीच्या टफावर उभे राहून मदतीसाठी आरडाओरड करत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना (Police) मिळाली. पोलिसांनी त्या तिघाही प्रवाशांना लाईफ जॅकेट देत तुडुंब भरलेल्या ओहळातून दोरीच्या सह्यायाने वर काढले.
सद्यस्थितीत चारही युवक सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी पोलीस कर्मचारी भोगले, राजाराम कापसे, रोहित कांबळे, दाजी परब यांनी या तिघांचे प्राण वाचवले.
या अपघाताबाबत वरील प्राथमिक माहिती मिळाली असून बातमी अपडेट करत आहोत...