सोपटे, सावईकर, कवळेकर, सतरकर, टिकलो यांना महत्त्वाची पदे
पणजी : प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात अनेक अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
माजी सभापती व प्रियोळचे माजी आमदार अॅड. विश्वास सतरकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतच माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्येकर, चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर आणि ग्लेन टिकलो यांनाही पक्षात महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.
पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
उपाध्यक्ष - दत्तप्रसाद खोलकर, अॅड. नरेंद्र सावईकर, कुंदा चोडणकर, विश्वास सतरकर, ग्लेन टिकलो, चंद्रकांत कवळेकर.
सरचिटणीस - सिद्धार्थ कुंकळ्येकर, सर्वानंद भगत
सचिव - दयानंद सोपटे, दीपक नाईक, आरती बांदोडकर, धाकू मडकईकर, संजना वेळीप, रानिया कार्दोज.
खजिनदार - संजीव देसाई
सहखजिनदार - पुंडलिक राऊत देसाई
माध्यम समन्वयक - सिद्धेश नाईक
मुख्य प्रवक्ते - आमदार कृष्णा साळकर
आयटी प्रमुख - गिरीराज पै वेर्णेकर
सोशल मीडिया प्रमुख - शुभम पार्सेकर
कार्यालय सचिव - सुधीर पार्सेकर