२ सिग्नल प्रशिक्षण केंद्रात अग्निवीरांची पासिंग आउट परेड
अग्निवीराला गौरवताना २ सिग्नल प्रशिक्षण केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर हर्ष भाटिया.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : नावेली येथील ५३२ अग्निविरांची पासिंग आऊट परेड आयोजित करण्यात आली होती. २ सिग्नल प्रशिक्षण केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर हर्ष भाटिया यावेळी उपस्थित होते.
लष्करी आणि तांत्रिक प्रशिक्षणाच्या यशस्वी पूर्ततेनंतर नावेली येथील मिलिटरी कॅम्प येथील २ सिग्नल प्रशिक्षण केंद्रात ५३० अग्निवीरांची पासिंग आउट परेड आयोजित करण्यात आली. भारतीय सैन्याच्या सिग्नल कॉर्प्सचा भाग म्हणून जबाबदाऱ्या आणि वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी या योद्ध्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २ सिग्नल प्रशिक्षण केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर हर्ष भाटिया यांनी परेडचे पुनरावलोकन केले. त्यांनी नव्याने दाखल झालेल्या अग्निवीरांना संबोधित केले. सर्वसामान्य युवकापासून भारतीय सैन्याच्या सक्षम आणि शिस्तबद्ध सैनिकात रूपांतरित झालेल्या अग्निविरांचे देशसेवेला प्रथम प्राधान्य असावे. कर्तव्य आणि सन्मानाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करणाऱ्या सैन्याचा ते एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांनी २ सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे आणि अग्निवीरांच्या कुटुंबातील सदस्यांचे कौतुक केले. पासिंग आउट परेडने ३१ आठवड्यांच्या कठोर प्रशिक्षणादरम्यान अग्निवीरांमध्ये निर्माण झालेल्या शिस्त, लवचिकता आणि अनुकूलता या मूल्यांवर भर देताना लष्करी परंपरेची अचूकता अधोरेखित केली. अग्निवीर पियुष रमेश पाटील, रजत इंदोलिया आणि गोविंद कुमार यांना प्रथम क्रमांकाचे मेरिट पदक प्रदान करण्यात आले. अग्निवीर देवरा शिवा यांना शारीरिक आणि क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पदक मिळाले, तर बियाक्ष गौडा यांना ड्रिलमधील सर्वोत्कृष्ट पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
२ सिग्नल ट्रेनिंग सेंटरचे कमांडंट यांनी अग्निवीरांच्या अभिमानी कुटुंबांशी आणि पालकांशी संवाद साधताना त्यांच्या वचनबद्धतेचे आणि त्यागाचे कौतुक केले. अभिमानी पालकांना राष्ट्रासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल ‘गौरव पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले.