मंत्रिपद जाण्याचे निश्चित : दोन दिवसांत चित्र होणार स्पष्ट
पुढील दोन दिवसांत गावडे यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा अपेक्षित
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडील आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीका केलेल्या गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचे निश्चित झाले आहे.
"पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर तत्काळ गावडे यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात येणार आहे" - भाजप सूत्रे
यापूर्वी अनेक वादांत सापडलेल्या मंत्री गोविंद गावडे यांनी गेल्या रविवारी फोंडा येथे आयोजित 'आदिवासी प्रेरणा दिन' कार्यक्रमात थेट मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीकास्र सोडले.
"पणजीतील श्रमशक्ती भवनच्या खाली कंत्राटदारांकडून 'घेवाण देवाण' देऊन फायली वरपर्यंत पोहोचवल्या जातात"
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले
दामू नाईक यांनी सोमवारी गावडे यांची बाजू ऐकून घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे
"राज्य सरकार आणि भाजपने विचार करूनच गावडेंना मंत्रिमंडळातून हटवावे"
"गावडेंऐवजी इतर आदिवासी आमदाराची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याची मागणी"
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिलई शनिवारी गोव्यात दाखल झाले. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकते.