कारचालकाविरुद्ध वेर्णा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद
वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एसयूव्हीच्या धडकेने रस्ता ओलांडणाऱ्या अनिषा सतीश बोरकर (२३, केपे) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षता उदय नाईक (२३, कारवार) ही गंभीर जखमी झाली आहे.
तिला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी कारचालक जोनाथन परेरा (१९, आगशी) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
"अपघातानंतर कारचालक स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याने घटनेची माहिती दिली आहे," - वेर्णा पोलिस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोनाथन परेरा वेर्णा येथील पाद्री कोसेसांव महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी तो परीक्षा देण्यासाठी आपल्या कारने घराकडून महाविद्यालयाकडे निघाला होता.
वेर्णा औद्योगिक वसाहतीसमोरील महामार्ग, सकाळी ८:३० वाजता
वेर्णा पोलिस स्टेशनमध्ये जोनाथन परेरा (१९, आगशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू
जोनाथन परेरा परीक्षेसाठी कारने घरून निघाला
वेर्णा औद्योगिक वसाहतीसमोर अपघात घडला
जोनाथन पोलीस ठाण्यात हजर झाला
पंचनामा पूर्ण, गुन्हा नोंदवला