भंडारी समाज आगामी निवडणुकीत ताकद दाखवणार : गावकर

पेडणे तालुका भंडारी समाजाच्या अध्यक्षपदी रोहिदास भाटलेकर

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
25th May, 12:56 am
भंडारी समाज आगामी निवडणुकीत ताकद दाखवणार : गावकर

गोमंतक भंडारी समाजाच्या केंद्रीय समिती सोबत पेडणे तालुका भंडारी समाजाचे निवडण्यात आलेले पदाधिकारी.

कोरगाव : राज्यातील ४० मतदारसंघात २६ ते ३० मतदारसंघ आम्ही जोडून ठेवले आहेत. प्रत्येक तालुक्यातील भंडारी समाज जनजागृती करणार असून त्याप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत भंडारी समाजाचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आणणार असल्याचे गोमंतक भंडारी केंद्रीय समाजाचे अध्यक्ष उपेंद्र गावकर यांनी सांगितले.
पेडणे तालुका भंडारी समाजाच्या अध्यक्षपदी शनिवारी रोहिदास भाटलेकर यांची केंद्रीय समितीच्या उपस्थितीत निवड झाली. यावेळी निवडण्यात आलेले समितीचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. उपाध्यक्ष चिंतामणी पोळजी, उदय मांद्रेकर, नानू मोरजकर, प्रदीप कांबळी, सरचिटणीस रुद्रेश नागवेकर सेक्रेटरी नितीन नर्से, खजिनदार गजानन गडेकर, सहखजिनदार विलास गडेकर. सदस्य
प्रशांत गडेकर, प्रदीप आरोलकर, नारायण तळकटकर, किरण हळद‌णकर, रघुनाथ मांद्रेकर, दीपक माहेकर, रुद्राक्ष मुरारी, बाळू राऊळ, संतोष पेडणेकर, विश्वास नारोजी, कांता आसोलकर, उमेश हळदणकर, गुंडू राऊळ, कृष्णा माइणकर, रोहिदास हरमलकर, रूपेश कुम्रलकर, नानू पालयेकर, भालचंद्र भगत, सल्लागर समिती- सुशांत मांद्रेकर, महादेव गवंडी, प्रदीप आरोलकर, विनोद मेथर
केंद्रीय सल्लागार समिती सदस्य रंगनाथ कलशावकर (जि. पं. सदस्य). पेडणे युवा समिती अध्यक्ष- मनोज हरमलकर (नगराध्यक्ष), पेडणे तालुका महिला अध्यक्ष- प्रतीक्षा आरोलकर.
पेडणे येथील श्री भगवती हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या व्यासपीठावर गोमंतक भंडारी केंद्रीय समाजाचे अध्यक्ष उपेंद्र गावकर, उपाध्यक्ष संदीप बेर्डेकर, सरचिटणीस हनुमंत नाईक, सचिव उमेश नाईक, केंद्रीय समितीचे सदस्य प्रभाकर मांजरेकर, उमेश तळवणेकर, नगराध्यक्ष मनोज हरमलकर, म्हापसा नगरसेवक तारक आरोलकर, जिपं सदस्य रंगनाथ कलशावकर आदी मान्यवर उपस्थित होते.