आसगाव- हणजूणमध्ये ३.९२ लाखांचा ड्रग्ज जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th May 2025, 12:17 am
आसगाव- हणजूणमध्ये ३.९२ लाखांचा ड्रग्ज जप्त

म्हापसा : हणजूण पोलिसांनी आसगाव आणि पिकेन- पेडे येथे ड्रग्ज तस्करी प्रकरणी छापा टाकून ३.९२ लाखांचा कोकेन, एमडीएमए व चरस जप्त केला. तसेच याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अटक केलेल्या संशयितांमध्ये संतोष नेमप्पा लमाणी (२४, रा. हणजूण व मूळ कर्नाटक) आणि अनिल हेटराम कुमार (२६, रा. हिमाचल प्रदेश) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या दोन ठिकाणी वेगवेगळी कारवाई शुक्रवारी रात्री केली.

आसगाव येथील चर्चजवळ छापा टाकून पोलिसांनी संतोष लमाणी याला अटक केली. त्याच्याकडून ९.४९ ग्रॅम एमडीएमए आणि ४.४६ ग्रॅम कोकेन हा २ लाख १० हजारांचा ड्रग्ज जप्त केला.

दरम्यान, दुसरी कारवाई पिकेन पेडे हणजूण येथे पोलिसांनी केली. संशयित आरोपी अनिल कुमार यास फुटबॉल मैदानाजवळ पोलिसांनी पकडले. झडतीवेळी संशयिताजवळ १ लाख ८२ हजारांचा १८२ ग्रॅम चरस सापडला. हा ड्रग्स जप्त करून पोलिसांनी संशयिताला अटक केली.

पोलीस निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज नाईक व साहील वारंग हे पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा