गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या ४ महिन्यांतील स्थिती
पणजी : गेल्या वर्षीच्या (२०२४) तुलनेत यंदा जानेवारी ते एप्रिलपर्यंत पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (पीसीआर) येणाऱ्या कॉलची संख्या १२.०८ टक्क्यांनी घटली. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिलपर्यंत पीसीआर कॉलची संख्या १२,३०२ होती. यंदा २०२५ मधील ४ महिन्यात १०,८१६ कॉल्स आले. हे प्रमाण १४८६ म्हणजे १२.०८ टक्के कमी आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली. कायदा सुव्यवस्थेत सुधारणा होऊन पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे, असा दावा पोलिसांनी केला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखळी चोरी (स्नॅचिंग)चे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले. बैलांच्या झुंजी ४२.९ टक्के, महिलांबाबतचे कॉल २१.५ टक्के, चोरी १६.१ टक्के, ध्वनी प्रदूषण १३.२ टक्के, वाहतुकीचे गुन्हे ११.९ टक्के, भांडणे आणि मारहाण ११.४ टक्के आणि अपघातांचे कॉल ९.९ टक्क्यांनी घटले.