महाविद्यालयीन प्रवेश : नापास पण पुरवणी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अर्जाची मुभा

इच्छुक महाविद्यालयात नसला तरी सर्व विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10th April, 05:16 pm
महाविद्यालयीन प्रवेश : नापास पण पुरवणी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अर्जाची मुभा

पणजी : बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण असलेले मात्र पुरवणी परीक्षेस बसू इच्छिणारे विद्यार्थी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अंतिम प्रवेश मात्र पुरवणी परीक्षेच्या निकालावर अवलंबून असणार आहे. कला, वाणीज्य, विज्ञान, बीबीए मिळून १० हजार जागा उपलब्ध असून सर्वांना प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यानी दिली.

समर्थ पोर्टलव्दारे उद्या ११ एप्रिलपासून अर्ज सादर करता येईल. ११ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची मुभा आहे. अर्जासोबत गुणपत्रिका (दहावी व बारावी), लीवींग सर्टीफीकेट, आधार कार्ड, फोटो, मायग्रेशन सर्टीफीकेट अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. एससी, एसटी विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

धेंपे, सेंट झेवीयर, चौगुले अशा शहरातील नामांकीत महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी गर्दी असते. सर्वांना इच्छेच्याच महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची खात्री देता येत नसली तरी दुसऱ्या महाविद्यालयात निश्चितपणे प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येइतक्या जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी दिली. 

सुरवातीला प्रवेशासाठी गर्दी असते. वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी व इतर अभ्यासक्रमांसाठी इच्छुक असलेले विद्यार्थीही महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करतात. व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया झाली की विज्ञान, वाणिज्य, कला शाखेत बऱ्याच जागा उपलब्ध होतात. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठी शहरातील नामांकीत महाविद्यालयामध्येही जागा उपलब्ध होतात.

हेही वाचा